Tuesday, 5 January 2010

मला वेळ नाही आता...खूप काम आहे वेळ नाही आता... सारखा फोन नाही करू शकत....आजकाल हे सारखाच कानावर पडत असत . खरच वेळ एवढा महाग झाला आहे का आजकाल. माणसाला दुसर्‍या माणसाकडून काय हवे असते. पैसा ?? नाही... हवा आसतो तो फक्ता थोडा वेळ....पण आजकाल तोच खूप महाग झाला आहे ...

जीवन जगण्याच्या रेस मधे सगळे पळत आहेत. आजकाल माणूस नाही तर पैसा हेच सर्वस्वा झाला आहे . कोण कसे आहे .. सुखामधे आहे का दुखामधे आहे ते पाहायला पण आजकाल कोणाकडे वेळ नाही. लहानपणी शाळेत शिकलो की माणूस हा समुहत राहणारा प्राणी आहे...भावनाप्रधान आहे..पण आता तसा काय राहिला आहे असे वाटत नाही .आजकाल दुसर्‍यांन कडे पाहायला पण वेळ नाही राहिला तर मग भावना कधी व्यक्त करणार..


आजकाल फक्त कामाच्य वेळीच आपल्या माणसाना एकमेकांची आठवण येत असते. काम झाल की मग परत कोणी लक्षातही ठेवत नाही...पण आता कामासाठी का होईना आपली माणसा थोडासा वेळ देतात तेच थोडस का होईना सुख...

Friday, 1 January 2010

कालच २००९चा शेवट्चा दिवस झाला.रात्रि घरी परतताना सहजच लक्ष चंद्रकड़े गेले. s.m.जोशी पुलावरून चंद्र पाहताना पावले तिथेच स्थीरावली.

अस्ताला जातानाचा चंद्र मनामधे खुपच खोलावर जाउन बसला.गडद अंधारात चंद्र क्षितिज पार करत होता. भोवतालचे वातावरण खूपच शांतचीत्त झाले होते. सर्व परिसर गोठून स्तब्ध झाला होता .

त्या शांताते मुळे तीच्या सर्व आठवणिंना पुन्हा किनारा मिळाला. तीच्या बरोबरचा प्रतेक क्षण आज परत जगावा असे वाटत होते. पण.. ती नाही याची जाणीवही करून देत होता...

पण आठवणी या आठवणीच असतात ...त्या खरा तर सावल्यान सारख्याच जितके आपण लांब जाईचा प्रयत्‍न करतो तितक्याच दाट होत जातात. पण आता त्याचीही सवय करून घेतली आहे....

या सगळ्याची आठवण करून देणार्‍या चंद्रा कडे लक्ष गेले. तो या क्षणाला साक्षीदार राहून मावळ्तीला चालला होता. हा क्षण कधी निसटूच नये असे वाटत होते. पण त्याचे क्षितिजापार जाणे आणि....मला रिक्त सुन्ञपण येणे हे जणू काही ठरलेलेच...

शेवटी...शेवटी घर पारतीची वाट धरली पण... ती ही आज परकी वाटत होती....